प्रतिनिधी गुड्डू कुरेशी
मकर संक्रांती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ सरिता गाखरे
यांची होती उपस्थिती
सिंदी (रेल्वे ): भाजपा महिला मोर्चाच्या
वतीने स्थानिक शिवप्रेम सभागृहात मकर संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ सरिता गाखरे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार उपस्थित होत्या. यावेळी समीर कुणावार व त्याच्या पत्नी श्रद्धा कुणावार याच्या सत्कार करण्यात आला.असून यावेळी भाजपा उपाध्यक्षा छाया सातपुते, महिला मोर्चाच्या महामंत्री अनिता मावळे, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, माजी नगराध्यक्ष बाबीता तुमाने, शशीकला क्षीरसागर, उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना समीर कुणावार मन्हाले की महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी आयोजित हळदी-कुंकू सत्कार समारंभाला महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या दिवसाने माझ्या जीवनात एक संस्मरणीय क्षण जोडला, कारण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. मी आणि आपले सरकार नेहमीच माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी काम करत राहू, याची मी ग्वाही देतो.
असे मत कुणावार यांनी व्यक्त केले.
संचालन पुष्पलता वडाद्रे , प्रस्तावना रोशणा पेटकर,यांनी केले. आभार भाजपा जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी मानले.
bjpmorcha:कार्यक्रमाचे आयोजन राजू गधारे, अमोल सोनटक्के, स्नेहल कलोडे, आरती अंतुलकर, रंजना शेंद्रे, अर्चना झाडे, माधुरी काटोले, आरती ताई वैशाली ताई वाघमारे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुधाकर वलके प्रभाकर तडस, रामेश्वर घंगारे, जगदीश बोरकुटे रामभाऊ सोनटक्के,पंकज पराते, मिलिंद पेटकर, तेजस सोनटक्के, राकेश श्रीवास, गुल्लू भसाली, अमोल बोगाडे, विपिन पेटकर या कार्यक्रमाला गोडव्याचे स्वरूप रविभाऊ वाघमारे यांनी दिले