एकनाथ शिंदेंना धमकी देण्यामागची धक्कादायक कहाणी(Eknathshinde)

0
6
अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

Eknathshinde:गुरुवारी रात्री मुंबईतील मंत्रालयाला एक धमकीचा ई-मेल मिळाला, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

उद्धव ठाकरेंचा धक्काप्रूफ आवाज: शिवसेनेतील गळतीला सामोरे जाण्याची तयारी(Uddhavthakre)

ही धमकी मिळताच मुंबई आणि अकोला एटीएस, तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली आणि बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे दोघा आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास करताना धमकीमागे वैयक्तिक वाद असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासातील धक्कादायक कारण

अभय शिंगणे (२५) आणि मंगेश वायाळ या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या रात्रभर चौकशी करण्यात आली आणि समोर आले की मंगेशने आपला मोबाइल अभयच्या मोबाईल चार्जिंगच्या दुकानात चार्जिंगसाठी ठेवला होता, त्याच मोबाइलवरून हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. प्रेमप्रकरणातून सुडाचा कट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अभयच्या प्रेयसीचा मृत्यू झाला होता आणि त्यासाठी मंगेश त्याला जबाबदार धरत असल्याचे समोर आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आरोपींचे नातेसंबंध आणि पुढील तपास

Eknathshinde:अभय आणि मंगेश हे आतेभाऊ-मामेभाऊ असल्याचे समोर आले आहे. मंगेश अल्पशिक्षित आहे, तर अभय बारावीपर्यंत शिकलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, खरा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिस पुढील चौकशी करत आहेत. माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here