प्रतिनिधी सचिन वाघे
Brekingnews:हिंगणघाट :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदनाच्या माध्यमातून तक्रार मा. मुख्याधिकारी ,नगरपरिषद हिंगणघाट यांना देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की गवंडी कामगाराचे नोंदणी करण्याकरिता ठेकेदाराच्या स्वाक्षरी करून नगरपरिषद येथील मुख्याधिकारी यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे त्या करीता अर्ज दिल्या नंतर सर्व कागतपत्र नगर परिषद तपासून मग प्रमाणपत्र दिल्या जातात अशी आमची माहिती आहे.
परंतु शहरात एक मोठे गिरोह आहे जे खोठे शिक्के मारून खोटी मुख्याधिकाऱ्यांचे स्वाक्षरी करून खोटे आवक जावक क्रमांक टाकून कामगारांचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आता पर्यंत तीस हजार पेक्षा जास्त दिल्याची माहिती मिळाली.
या असल्या गोरख धंद्यात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे अशी मोठया प्रमाणावर चर्चा आहे. या लोकांचे असे खोटे काम सत्ताधारी नेत्याचे आदीपत्याखाली सुरू आहे असे लोकांच म्हण आहे.
हे दलाल लोकांची इतकी हिम्मत वाढली कि ते कोणालाही न घाबरता ठेकेदार व मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र वरील बोगस प्रकारचे रबर स्टॅम्प व मा. मुख्याधिकारी याची स्वाक्षरी करून त्या संबंधित गवंडी कामगार तथा इतर कामगार यांच्याकडून मोठया प्रमाणावर पैसे घेऊन सदर प्रमाणपत्र बाहेर च्या बाहेर वितरित करून देतात.
या संदर्भात गवंडी कामगारांना काहीच माहिती नसते कि त्यांना मिळालेले प्रमाणपत्र खरे आहे कि खोटे. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर कामगार कल्याण कार्यालय वर्धा यांच्या कडे ऑनलाईन नोंदणी करून घेतात.
अर्ज करणारे सदर इमारत बांधकाम कामगार हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असून त्यांना शासनाच्या मार्फत पुरविण्यात येणाऱ्या कामगार किट, तथा घरगुती भांडे किट, तसेच मुलांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती व इतर योजना त्यांच्यासाठी अमल्यात असून त्या संदर्भात या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगाराकडून या दलाला मार्फत अशी खोटी खोटी नोंदणी करून पैसे उकडण्याचा डाव सतत सुरू आहे.
सोबत दिलेले काही प्रमाणपत्र आम्ही निवेदनाच्या सोबत जोळले आहे. आपण त्याचा तपासणी करून सदर नोंदणी प्रमाणपत्र नगर परिषद कडून दिले आहे, किंवा नाही. याची शहानिशा करून तात्काळ या चुकीच्या लोकांवर ४२० चा गुन्हा नोंद करून कारवाई करावी . झालेला घोळ लवकरात लवकर थांबवा .अन्यथा शिवसेना द्वारे उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मा. मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना देण्यात आली .
Brekingnews:निवेदन देतांना पक्षातर्फे उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक मनीष देवडे ,सुनील आष्टीकर, शितल चौधरी ,गजानन काटवले, पप्पू घवघवे, अमोल वादाफळे, प्रशांत कांबळे ,अनंत गलांडे, शंकर झाडे, धीरज धोटे, शंकर मोहमारे, राजू मंडलवार, शंकर भोमले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.








