प्रतिनिधी सचिन वाघे
RevenueNews:हिंगणघाट :- उपविभागीय अधिकारी पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर वेळा शिवारात कारवाई करीत दोन टिप्पर व ६ ब्रास वाळू जप्त केल्याची माहिती ९ मे रोजी उपविभागीय अधिकारी पथकाने दिली आहे.
Accdent news/ रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने दोन लहान मुलांना चिरडले; आजी-आजोबा गंभीर जखमी
प्राप्त माहितीनुसार उपविभाग अधिकारी आकाश अवतरे यांच्या पथकाला दारोडा व शेकापुर घाटातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने ८ मे रोजी रात्री ११ वाजता हिंगणघाट वर्धा रोड वरील वेळा शिवारात सापडा रचुन टिप्पर क्रमांक एम एच ३६ १६७० आणि टिप्पर क्रमांक एम एच ३१ सि.क्यू ०४३८ ला थांबवू पाहणी केली असता यामध्ये वाळू भरून आढळून आली.
यावेळी चालकांना वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे मिळून आले नाही वाळूसह दोन्ही टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
RevenueNews:हि कारवाई उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांच्या मार्गदर्शनात उपविभाग अधिकारी पथकाचे मंडळ अधिकारी देविदास हेमने, तलाठी सय्यद तलाठी लढी महसूल सेवक दिनेश कोहपरे यांनी केली आहे.