Home Breaking News तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

वाळू माफियाला थांबवण्याचा प्रयत्न, तहसीलदारांवर शिवीगाळ व धमकी

महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने नदी पात्रात धाव घेतली. त्यांना एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला,

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

पण त्या ठिकाणी तीन ईसम संशयास्पद रित्या वाळुच्या ढिगाऱ्या आढळून आल्या. त्यांपैकी दोघांनी नाव सागर उमाळे व नामदेव थारकर हे पहुरपुर्णा येथील निवासी असल्याचे सांगितले, तर तिसऱ्याने नाव लपवले.

या घटनेत, सागर उमाळे याने अश्लील शिवीगाळ करून नदी काय तुमच्या बापाची आहे काय? असे सांगितले, तर नामदेव थारकर याने दम असेल तर १० मिनिट येथेच थांबा, तुम्हाला विना नंबरच्या वाहनांनी चिरडतो.

आणि खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो असी धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही दोनचाकी गाडीवर निघून गेले.

revenue:या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.