[ जनतेतून सरपंच पदाची थेट निवडणूक होत असल्याने निवडणूक चुरशीची होणार!]
SarpanchNews/संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण )ः- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रा.प.च्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सन २०२५ – २०३० ह्या कालावधीसाठी आज दि.९ / जुलै रोजी पार पडली. सरपंच पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार!
जि प हायस्कूल संग्रामपूरच्या प्रांगणातील सभागृहात आज दु.१२ वा. जळगाव (जामोद ) उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ५० ग्रा.पं.चे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ह्यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील नामदेव जुनघरे, निवासी ना.तह. तहसीलदार राहुल वसावे,सं.गां.नि.यो.चे नायब तह. विकास शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्व प्रथम तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सन २०२५ – २०३० ह्या वर्षासाठी सरपंच पदाकरीता सरपंच पदातून काढण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देवून तालुक्यातील ५० ग्रामपंचायती करीता अनु. जाती स्त्री – ४ , अनु. जमाती स्त्री -३ , ना.मा.प.प्रवर्ग स्री- ५ , सर्वसाधारण स्री- १३ एकूण महिला सरपंच पदासाठी २५ , तर सर्वसाधारण – १० , ना.मा.प्र.- ६ , अ.जमाती- ५ , अ.जाती- ४ , एकूण २५ असे ५० सरपंच पदासाठी सन २०२५ – २०३० करिता नवीन आरक्षण काढण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते इश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण काढून जाहीर करण्यातआले.
SarpanchNews/ह्या आरक्षण सोडत साठी निवडणूक विभागाचे सहा. महसूल अधिकारी जी.पी. ठाकरे , योगेश खारोडे , महसूल सहा. नितीन गोरे , निवडणुक विभागाचे संगणक परिचालक गोपाल बोंबटकार व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आज आरक्षण सोडतीचे वेळी सुद्धा रिमझिम पाऊस सुरू होता.तरीही अनेक आजी ,माजी सरपंच तसेच महिला सरपंचाचे पती,इतर राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.