प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- माजी आमदार राजू तिमांडे हे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये अनेक राजकीय फेरबदल होताना दिसून येत आहे. यात राजू तीमांडे हे आपले जुने सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्यासोबत परत नव्या उमेदीने काम करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहे.
Bjpnews/विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजप मधे राजकीय प्रवेश..
विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर राजू तिमांडे यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र सध्या सर्वत्र परिस्थिती वेगळी आहे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असे चित्र अजिबात नाही.
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, व शिंदे शिवसेना यात हिंगणघाट शहरामध्ये भाजप व आता राजू तिमांडे यांचा अजित दादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष भक्कम मजबूत पहावयास मिळेल. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोठी ताकद तर शिवसेना उबाठा पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात असल्याने हे दोनही पक्ष प्रबळ दावेदार आहेत.
काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरात जेमतेम बांधणी असल्याने हा पक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिंदे शिवसेनेप्रमाणेच मागे पहावयास मिळेल. मात्र यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्ष हा अतिशय मजबूत असल्याने व ओबीसी किंवा ओपन अशी उमेदवारी थेट जनतेच्या नगराध्यक्षाची आल्यास राजू तिमांडे यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाईल फेसबुक, व्हाट्सअप , तसेच शहरातील मुख्य चौकात, सध्या याच विषयावर सगळीकडे चर्चा सुरु असल्याचे दिसले
. यामुळे उदया राष्ट्रवादीमध्ये होणारा माजी आमदार राजु तिमांडे यांचा प्रवेश हिंगणघाट नगरपालिकेचे चित्र बदलवणारा असेल! कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी यांनी तत्पूर्वी हिंगणघाट नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पद भूषवले आहेत. मात्र मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुधीर कोठारी यांची जमानत जप्त झाली होती.
यामुळे कोठारी यांचा तीमांडे यांच्यावर डाव लावण्याचा हा पक्षप्रवेशाच्या माध्यमातून प्रयत्न तर नाही? राजू तिमांडे हे जर राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार झाल्यास राष्ट्रवादी पक्ष हा मोठा पक्ष म्हणून हिंगणघाट नगर पालिकेत पहावयास मिळण्याची शक्यता आहे. सध्या हिंगणघाट मध्ये अजित पवार येणार या पेक्षा जर तर चर्चेला जास्त उधाण आल्याचे दिसत आहे