उमरगा : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे पंचनामे पुर्ण करुण शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची तातडीची मदत देण्यात यावी . या मागणीचे निवेदन कृषिमंत्री ना दत्ता मामा भरणे यांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांनी दि.१७ रोजी मुंबई येथे दिले आहे .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळापैकी २२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे .तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये आज अखेर आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे .असे असताना प्रत्यक्षात मात्र धाराशिव जिल्ह्यातील अनेक पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त किंवा खराब झालेली आहेत. यामुळे चुकीच्या पर्जन्याची नोंद होत आहे. व त्यामुळे अनेक महसुल मंडळे अतिवृष्टीतुन वंचीत राहत आहेत. वास्तव परीस्थिती पाहता सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस व नुकसान झालेला आहे.
Loharanews /परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा दीडशे टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद असल्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन,उडीद ,तुर इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी ही बाब विचारात घेऊन यंत्रणेस पंचनामे करण्याचे आदेश व्हावे व धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची सरसकट नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात म्हटले आहे .