प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधानसभा केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट शहरातील मोहता चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक आयुष्यात काम करीत असताना विरोधात असलेल्या व्यक्तीचा देखील सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे.Atulvandile
मतभेद हे वैचारीक असले तरी त्यामुळे परस्परांचा अनादर होईल अशी विधाने होऊ नयेत हे तत्व अगदी काही वर्षांपर्यंत काळापर्यंत पाळले जात होते. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही विकृतांना मोकळे रान देऊन आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा अनिष्ट पायंडा विद्यमान राज्यकर्ते मंडळींनी पाडला ही अतिशय खेदजनक बाब आहे.स्व. राजारामबापू पाटील हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले विकासाभिमुख नेतृत्व होते. Sharadpawar
त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर जयंतराव पाटील यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे. या अशा समर्पित कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या नादान व्यक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत असतील तर ते राज्याची सार्वजनिक संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम करीत आहेत असे म्हणावे लागेल. अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.असे राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी मत व्यक्त करीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. Sharadpawar
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक मोहम्मद रफिक, समाजसेवक सुनिल डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा सचिव मिलिंद कोपुलकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद,अल्पसंख्याक सेलचे पाशु मिर्झा, मो.अली अजानी, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर,युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, सुनील भुते,नितीन भुते,हेमंत घोडे, संजय गांभुळे,परम बावणे, सुनिल घोडखांदे,किशोर चांभारे, नदीमभाई,महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील,समता वाणी , सुलभा मुन, साधना ढवळे, दुर्गा येसंनकर, विनोद मिलमिले, अनिल लांबट,साहेबराव येडे,प्रशांत एकोणकर, बच्चू कलोडे, उमेश नेवारे, गजानन महाकाळकर,जितेंद्र रघाटाटे,बबलू शेख, कुणाल येसबरे, प्रवीण भुते,विपुल थुल, राहुल जाधव, देवा शेंडे, अमित रंगारी, शेखर ठाकरे,रवी गिरसावले, नरेश चिरकुटे,सुभाष सोयाम,राहुल जाधव, छोटू वानखेडे, विपुल वाढई,पंकज भट्ट, मोहम्मद शाहिद, हुकेश ढोकपांडे, दीपक चांगल,पंकज वांदिले,विजय हजारे, पप्पू आष्टीकर, मारोती राऊत, गोलू भुते,भारत बावणे, अमोल भिषेकर,अभय सावरकर, निखिल शेळके, आकाश हुरले, अभिजित साबळे,यश झाडे आदी उपस्थित होते.