प्रतिनिधी सचिन वाघे
वडनेर :- नॅशनल हायवे इंफ्रा ट्रस्ट (NHIT) च्या बोरखेडी-वडनेर-केळापूर प्रकल्पाच्या वतीने वडनेर गावात स्वच्छता अभियान व स्मार्ट क्लासरूम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्यांची तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेसमोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडनेर येथे एक अत्याधुनिक स्मार्ट वर्ग खोली तयार करून देण्यात आली. या वर्गात 75 इंची एलईडी टीव्ही व 30 डेस्क-बेंच बसविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा शैक्षणिक उपयोग करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
Farmernews/ मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकेश कुमार सिंह सर (रिजनल ऑफिसर, NHAI) होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सी.एम. सिंन्हा सर (प्रोजेक्ट डायरेक्टर, नागपूर PIU, NHAI), मा. नरेश वडेट्टीवार सर (प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, NHIPMPL), मा. अभिजीत जिचकार सर (प्रोजेक्ट डायरेक्टर, चंद्रपूर PIU), मा. कृष्णाजी महाजन सर (संस्थापक, नूतन शिक्षण संस्था) आणि मा. अमित कुमार राणा सर (प्रोजेक्ट हेड, NHIT) हे उपस्थित होते. तसेच पी. बाला गणेश सर (NHIT) यांचाही सहभाग होता.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थापक कृष्णाजी महाजन सर यांनी दारोडा टोल प्लाझा व NHIT यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारची मदत अन्य शाळांनाही मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
मा. राकेश कुमार सिंह सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कोरोना काळात डिजिटल शिक्षणाची गरज भासू लागली. मोबाईल, टॅब आणि इंटरनेटमुळे शिक्षणात नवे पर्व सुरू झाले असून अशा स्मार्ट वर्ग खोलींचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान ठरणार आहे.याच दिवशी श्री. संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, उमरी (ता. पांढरकवडा) येथेही स्मार्ट क्लासरूम तयार करण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन दारोडा टोल प्लाझा मॅनेजर मलकीत सिंह, केळापूर प्लाझा मॅनेजर नीरज रामयानी, राहुल सिंह, पंकज हिंगे, भानुप्रताप सिंग, राजपाल सिंग, अक्षय मातरमारे आणि इतर NHIT कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन केले.