हडस्ती (सास्ती) येथे भव्य प्रवेश सोहळा; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट | दि. २३ सप्टेंबर २०२५ (मंगळवार)
हडस्ती (सास्ती) येथे आज उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणादायी कार्यपद्धतीने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील शरद खुडसंगे, वैभव ढगले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रमुख अमित गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी वर्धा संपर्कप्रमुख राज दीक्षित, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहागडकर, वर्धा शहरप्रमुख शार्दूल वांदिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवसेना शाखेचे उद्घघाटन उत्साहात
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट) च्या हडस्ती (सास्ती) येथील शाखेचे उद्घघाटन मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडले. यावेळी शाखाप्रमुख म्हणून वैभव देऊळकर, तर शाखा सचिव म्हणून रोहन गौळकार यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात राज दीक्षित यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षाच्या धोरणांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन वैभव ढगले, तर आभार प्रदर्शन वैभव देऊळकर यांनी केले.
सन्माननीय उपस्थिती आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमास तालुका संघटक शरद खुडसंगे, जि.प. सर्कल प्रमुख अनिल ढगले, उपतालुका प्रमुख वैभव ढगले, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिनेश काटकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय ढगले, ज्येष्ठ नागरिक गणेश विरुळकर, अरुण रोंघे यांची विशेष उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, गावातील अनेक युवकांनी देखील या वेळी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये प्रमुख नावे पुढीलप्रमाणे:
शंकर जाधव, निखील नांदेकर, मुकेश ढगले, संघर्ष तिजारे, प्रफुल भोयर, सतीश अंड्रस्कर, आशिष देउळकर, तुषार ढगले, उदय रिंगणे, महेश पुस्नाके, शुभम बोरकर, अनिकेत ढगले, विशाल अत्राम, प्रशांत दुधनकर, विक्रम आत्राम, प्रतीक सराटे, सुजल जाधव, अनिकेत निवलकर, तेजस विरुळकर, अथर्व ढगले, क्रिश देउळकर, किशोर विरुळकर, सुमित विरुळकर, राज विरुळकर यांचा समावेश आहे.
शाखा कार्यकारिणी जाहीर शाखा प्रमुख: विशाल देउळकर शाखा सचिव: रोहन विरुळकर शाखा संघटक: अतुल नांदेकर शाखा उपप्रमुख: गौरव ढगले उपसचिव: विशाल सं. देउळकर शिवदूत: तुषार ढगले कार्यक्रमात “८०% समाजकारण – २०% राजकारण” या पक्षाच्या मूळ विचारसरणीला अनुसरून युवकांना सामाजिक बांधिलकीचे भान देणारे विचार मांडले गेले. एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे गावागावातील तरुण पिढी शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.