अतिवृष्टीने शेतकरी सभासद अडचणीत असल्यामुळे १०% लाभांश देणार – प्रा . सुरेश बिराजदार
————
बातमीदार ऋषिकेश सुरवसे
उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२७) रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे उत्साहात संपन्न झाली. धाराशीव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आलेला आहे .त्यामुळे यावर्षी दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी जाहीर केले .
यावेळी संचालक सुनील माने ,गोविंदराव साळुंखे , साहेबराव पाटील , विजयकुमार सोनवणे, व्यंकटराव सोनवणे,डॉ . मल्लिनाथ मलंग यांच्यासह पद्माकरराव हराळकर ,योगीराज कदम ,आर.डी माने,अभिजीत माडीवाले,किसन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती
बँक आजतागायत सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये आहे .
बँकेचा ठेवीदार हा व्यवसायाचा कणा असतो. ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेला विश्वासावरच बँकेची प्रगती अवलंबून असते. याशिवाय लातूर शहरात पुढील तीन महिन्यात एक तर सोलापूर, बीड, पुणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये भविष्यात उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सभासद मोठ्या अडचणीत आहेत अशा परिस्थितीत त्यामुळे सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले .
पारदर्शक कारभार करून बँकेने विश्वासाने निर्माण केली आहे बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम , एस.एम.एस.,आरटीजीएस, एनईएफटी ,आय एम पी एस ,यु पी आय, सुरक्षीत लॉकर, सुविधा बँकेने सुरू केली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी आर . के . शहापुरे यांनी सभे पुढील विषय वाचन केले . नानाराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार संचालक साहेबराव पाटील यांनी मानले .
Umrganews/यावेळी सुनिल साळुंके , शमशोद्दीन जमादार , रमेश बिराजदार ,संचालक इंद्रजीत घोडके , संजय गायकवाड ,सतीश साळुंखे , रामकृष्ण बिराजदार ,शिवाजीराव मोरे , राहुल पाटील , मधुकर सोनवणे , ॲड संदीप ढगे -पाटील ,यांच्या सह अशोक कारभारी , कमलाकर काळे, मारुती पाटील,संजय जाधव , व्ही एम.पाटील ,सत्यनारायण जाधव ,आयुब पटेल ,पवन पाटील ,
प्रा. सतीश इंगळे ,दयानंद बिराजदार, ब्रिजेश बिराजदार, सुरेंद्र पौळ ,विजय चव्हाण ,संतोष शिरगुरे , सतीश सुरवसे ,विष्णू माने, भरत जाधव, श्री . तांबे, श्री . माळी याच्यासह बँकेच्या सातही शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते