बातमीदार-: ऋषिकेश सुरवसे
Sadabhaukhot/उमरगा : मागील काही दिवसांपासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह उमरगा तालुक्यातही शेतातील पिकांसह शेतशिवाराचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी कृषी राजमंत्री आमदार सदाभाऊ खोत व उमरगा नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी बांधावर जावून पाहणी केली.
यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिले.
उमरगा तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. मुग, उडीद व सोयाबिन पिकात पाणी उभारल्याने पिके नासुन गेली आहेत. तर तुरीसह इतर खरीप पिकांना पाणी लागुन ती पिवळी पडली आहेत. ऊसाचे फड आडवे झाले आहेत.
यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पहात आहेत.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
त्यांनी तालुक्यातील येणेगुर, दाळिंब, येळी आदी गावात झालल्या नुकसानीचे शनिवारी (दि. २७) रोजी पाहणी केली. पाहणीदरम्यान उमरगा तालुक्यात शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगुन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
मनोज यमुलवाड मंडळ अधिकारी दाळिंब, रंजना राठोड ग्राम महसूल अधिकारी येणेगूर, जी बी शेख सहाय्यक कृषि अधिकारी येणेगूर, अविष्कार भालेराव सहाय्यक कृषि अधिकारी दाळिंब, सदानंद इंगळे ग्रामपंचायत अधिकारी येणेगूर उपस्थित होते
यावेळी शेतकरी महेश सोनवणे,महेबुब मुल्ला, महादेव बिराजदार, सतिश जाधव, शरण बिराजदार, अल्ताफ मुल्ला, अजीम खजुरे उपस्थित होते.
Sadabhaukhotआमदार सदाभाऊ खोत यांनी वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट याठिकाणी भेट दिले असता भारतीय संविधान व बुद्ध आणि धम्म ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैशाली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष-प्रा.अजय कांबळे , उपाध्यक्ष-अमोल कांबळे व सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच-निवृत्ती पवार ,शिवलिंगप्पा माळी (माजी सरपंच), व्यंकटराव मोरे(माजी उपसरपंच),प्रा.जी.एस.सुरवसे ,आयु.भिमराव निवृत्ती कांबळे, आयु.रोहिदास कांबळे आयु.संदीपान गणपती कांबळे, आयु.नागनाथ श्रीपती कांबळे,बबन कांबळे, अभिमन्यू कांबळे, विशाल कांबळे,हरीश कांबळे बाबा पवार आदी उपस्थित होते आदीसह विविध गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते