प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट, दि. १ ऑक्टोबर २०२५ तालुक्यातील पोहणा गावातील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी रुद्रेश्वर देवस्थान आता अधिकृतपणे ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले असून, पालकमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली.
यापूर्वी या देवस्थानास ‘क वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली असून, त्यानंतर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा उभारण्यात आल्या होत्या. सौंदर्यीकरण, पथदीप, प्रसाधनगृह आणि सभागृह आदी विकासकामांनी मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले.
रुद्रेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नसून, इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे प्रतीक मानले जाते.
सुमारे १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधले गेलेले हे मंदिर ५० फूट उंच, ८० फूट लांब आणि ३६ फूट रुंद असून, एकाच दगडातून कोरलेली दुर्मिळ पिंड व राष्ट्रकूटकालीन चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती या वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार समीर कुणावार म्हणाले, hingnghatnews
https://x.com/AnilsingC?t=CmSAEnZpEbhXPC4aXjRuRQ&s=09
X अकाउंटला आताच फॉलोव करायला विसरू नका
Sameerkunavar/“या निर्णयामुळे केवळ देवस्थानाचा गौरव वाढला नाही, तर पोहणा गावाची धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण झाली आहे. भाविकांची संख्या वाढेल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि परिसराचे सांस्कृतिक महत्त्व अधिक दृढ होईल.”हा निर्णय पोहणा गावासाठी तसेच संपूर्ण हिंगणघाट तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.








