प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट (01 ऑक्टोबर 2025):
दुर्गा उत्सव व इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून आज दिनांक 01/10/2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, हिंगणघाट येथील मीटिंग हॉलमध्ये शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत हिंगणघाट, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे,हिंगणघाट तहसीलदार योगेश शिंदे,नायब तहसीलदार सागर कांबळे, हिंगणघाट नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक , हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना, नागरिक यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.
Navdurga /बैठकीत उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. ध्वनीप्रदूषण, वाहतूक व्यवस्थापन, वाद टाळणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. प्रशासन व पोलिसांचे सहकार्य लाभावे यासाठी नागरिकांनी सजग राहून शांतता व सलोख्याने सण साजरे करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.