प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे अपुरे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे वर्धा जिल्ह्यात ‘काळी दिवाळी’ साजरी करत तीव्र निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले आणि जेष्ठ नेते सुनिल राऊत यांनी केले.
या वेळी बोलताना वांदिले म्हणाले, “सातबारा कोरा करू म्हणणारे आज कर्जमाफीचं नावही घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम सरकार करत आहे.”
पक्षाच्या प्रमुख मागण्या सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹75,000 प्रोत्साहनपर मदत
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 नुकसानभरपाई जनावरांच्या मृत्यूबाबत ₹70,000 पर्यंत भरपाई गाळ भरलेल्या विहिरींसाठी प्रती विहीर ₹1 लाख मदतमजुर कुटुंबांना ₹25,000 रोख मदत
घरांचे नुकसान झालेल्यांना पीएम आवास योजनेच्या बाहेर दीड लाखांची मदत
विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे
वांदिले यांनी सांगितले की, “सरकारने पॅकेज जाहीर करताना पीक विमा योजना आणि त्यातील ‘ट्रीगर’ बदलले, यामुळे शेतकऱ्यांच्या हातून हजारोंची रक्कम गेली आहे.”
उदाहरणार्थ, सोयाबीनसाठी ₹49,300, कापसासाठी ₹51,000 मिळू शकले असते, परंतु सरकार केवळ ₹8,500 ची तुटपुंजी मदत करत आहे, ही थट्टा आहे, अशी टीका त्यांनी केली.
या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये जिल्हा व शहर स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
Sharadpawar /सरकारची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ उघड झाली आहे. अन्नदात्याची थट्टा सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारवर केली टीका
प्रतिक्रिया –अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष, रा.कॉं.पा. (शरद पवार गट)”सत्तेच्या मस्तीत बुडालेल्या बहिऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही. म्हणून आज आम्ही काळी दिवाळी साजरी केली. अन्नदात्याच्या व्यथेशी आम्ही आहोत