प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट (दि. २३ ऑक्टोबर २०२५) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी (महिला सर्वसाधारण) उमेदवार निवड करण्याकरिता आढावा बैठक आज पक्ष कार्यालयात दुपारी ३ वाजता संपन्न झाली.
या बैठकीस माजी उद्योगराज्यमंत्री तथा माजी आमदार आणि हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख मा. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुकाप्रमुख मनीष देवडे, तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, शहरप्रमुख चंदू भुते यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अशोक शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत तालुकाप्रमुख मनीष देवडे यांनी पक्षाकडून लोकशाही मार्गाने उमेदवार निवड करण्याचे आवाहन केले. उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करून नगरपरिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी हिंगणघाट नगरपरिषद भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करावे, असे सांगत पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.
बैठकीत उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या एकमताने निता सतीश धोबे (माजी नगरसेविका) यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे नाव वरिष्ठांकडे शिफारसीसाठी पाठविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात अशोक शिंदे यांनी सांगितले की, “आपण सारे शिवसैनिक एकत्र राहिलो तर विजय निश्चित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी शिवसेना आहे.”
या बैठकीस अनेक मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते








