प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात “चलो नागपूर महाएल्गार” या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य प्रमाणावर होणार असून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणे ही काळाची गरज आहे.
Bachhukadu/कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकत नाही.”रॅलीत प्रहार जनशक्ति पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या उत्साहात सहभागी होणार असून नागपूर येथे होणारा हा ‘महाएल्गार’ राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा इशारा देणारा ठरणार आहे.








