प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेम मंदिर वृद्धाश्रम, शहालंगडी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षा कविता मुंगले होत्या.
कार्यक्रमात कविता मुंगले समता परिषदेच्या स्थापना दिनाचा उल्लेख करताना सांगितले की, 1 नोव्हेंबर 1992 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाली.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बहुजन समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कार्य करणारी ही संघटना आज 34 वर्षे पूर्ण करत आहे, असे त्या म्हणाल्या.
Hingnghatnews /या प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना टॉवेल आणि फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा अध्यक्षा कविता मुंगले यांच्यासह पदाधिकारी सुजाता जीवनकर, दीपाली रंगारी, सुनिता तळवेकर, रागिणी शेंडे, गिरी मॅडम, सारिका गायकवाड, योगिता मेश्राम, रीना रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.






