प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट:-हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था संचलित ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील तनवी कन्नाके हिने अलीकडेच पार पडलेल्या विभागीय स्तरावरील जुडो स्पर्धेत अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
तनवीच्या या यशामुळे ज्ञानदीप परिवारात आनंद आणि अभिमानाची लहर पसरली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण ढोबे, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल, तसेच क्रीडा शिक्षक रोहन हुमाड यांनी तनवीचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदीप विद्यानिकेतन ही संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे. तनवी कन्नाकेने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने शाळेचे नाव उज्ज्वल केले असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
Hingnghatnews /शाळेच्या शिक्षकवर्गाने आणि विद्यार्थ्यांनी तनवीचे अभिनंदन करत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.






