Dharashivnews /बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात ऐतिहासिक संघदिन मोठ्या उत्साहात साजरा

0
33

– – – – – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : (वा) बौद्ध जगतात वैशाख पौर्णिमेला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व कार्तिक पौर्णिमेचें आहे. जगभरात तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार कार्तिकी पौर्णिमेला झाला. हा दिवस ऐतिहासिक संघदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो असे प्रतिपादन धम्मचारी प्रज्ञाजित यांनी केले. शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात बुधवारी ऐतिहासिक संघदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला या वेळी ते बोलत होते.

या वेळी धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की,तथागतच्या ज्ञान प्राप्ती नंतर त्यांचे समकालीन असलेले पंचवर्गीय भिक्षु बुद्ध झाले पण यश यांच्या धम्म दीक्षेनंतर संघाची निर्मिती झाली.तथागत भगवान बुद्धांनी चरीत भिख्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश आपल्या भिक्षुंना दिला, बहुजनांच्या कल्याणासाठी भिक्षुना दाही दिशेला जाऊन धम्म सांगण्याचा, सर्वांप्रती करुणा हृदयात ठेवून त्यांचे दुःख दूर करण्यासाठी भ्रमण करत रहा,

असा संदेश दिल्यानेच आज जगभरात बौद्ध धम्म पोहोचला असल्याचे ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला शरण जाऊन त्यांच्या शिकवणीला प्रतिज्ञा बद्ध होऊन आचरण करून लोकांच्या समोर एक आदर्श धम्मसेवक भिक्षु असावा लोकांनी त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आणि तो लोकांची सेवा करणारा असावा, स्वतः धम्माचे आचरण करून इतरांना धम्म सांगणारा असावा असे म्हणाले.

१९५० साली महाबोधी पत्रिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नवा धम्मसेवक कसा असावा यांचे विवेचन केले आहे.त्या धम्मसेवकांनी बुद्ध धम्माचा प्रचार करणे,
लोकांचे दुःख नाहीसे करणे,तसेच जागतिक संघाची निर्मिती करणे व बौद्धांचा संयुक्त वेगळा धर्मग्रंथ असावा असे सांगितले आहे.बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी माझे जीवन समर्पित करणार आहे असा बाबासाहेबांनी मनोदय व्यक्त केला होता, त्यास अनुसरून प्रत्येकाने की बौद्ध धम्म प्रचार- प्रसारा करिता स्वतःचे योगदान देणे आवश्यक आहे, तरच प्रबुद्ध भारताचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल असे ते म्हणाले.

Umrganews /त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सर्व ठिकाणी कार्तीक पौर्णिमा संघ दिन म्हणून जगभर साजरी केली जाते,अनेकांचे दु:ख करण्यासाठी आपण कृतिशील राहू या हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.या प्रसंगी जी.एल.कांबळे तानाजी कांबळे,चद्रकांत कांबळे,राजेंद्र सुरवसे,उत्तम गायकवाड, संतोष दलाल,वगरसेन कांबळे,मंदाताई टिळे,संघप्रिया कांबळे आदी धम्ममित्र उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले आभार धम्मचारी विबोध यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here