प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :-हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तयारीचा बिगुल वाजवला आहे. जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर यांच्या नेतृत्वात आज हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, मनसेकडून चार दमदार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
जाहीर करण्यात आलेले संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे –
1️⃣ केतन तायवाडे
2️⃣ सतीश चतुर
3️⃣ श्रीकांत तळवेकर
4️⃣ हर्षल गुंडे
या चौघांनाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी देखील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, हिंगणघाट तालुका अध्यक्ष पवन तडस, समुद्रपूर तालुका अध्यक्ष विठ्ठल तळवेकर, विधानसभा संघटक अमर बकाणे, देवा काटकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत तळवेकर, हिंगणघाट शहराध्यक्ष केतन तायवाडे, शेतकरी सेना शहराध्यक्ष सतीश चतुर, तसेच योगेश नासरे, केशव उमाटे, हर्षल गुंडे, अभिजीत तायवाडे, अनिकेत वानखडे, स्वप्निल दाते आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी, मतदारसंघनिहाय नियोजन आणि पक्षविस्तारावर सविस्तर चर्चा झाली.
Wardhanews /कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, हिंगणघाटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे उभी राहत असल्याचे चित्र या बैठकीत स्पष्टपणे दिसून आले.






