(सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा)
उमरगा प्रतिनिधी -: उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदासाठी दोघांनी तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यात नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे यांच्या वतीने किरण गायकवाड यांनी तर अपक्ष म्हणून शिवशंकर दंडगुले यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
नगरसेवक पदासाठी वार्ड क्रमांक १ ब मध्ये विनोद कोराळे, राहुल शिंदे, अमरनाथ शिंदे शिंदे सेना, तर दताञय शिंदे उबाठा, वार्ड क्रमांक २ अ स्वाती स्वामी शिंदे सेना, ब मधून विरपाक्षय्या जवळगे शिंदे सेना, वार्ड क्रमांक ३ अ अश्विनी सोनकांबळे, कान्होपात्रा सोनकवडे शिंदे सेना, ३ ब रोहित पवार शिंदे सेना, राम धोञे कॉंग्रेस, वार्ड क्रमांक ४ अ यल्लामा विभूते शिंदे सेना, ब मधून वशीम शेख, बशीर शेख, गणेश दंडगुले शिंदे सेना, वार्ड क्रमांक ५ अ दुर्गा इरप्पा धोञे शिंदे सेना, ब मधून प्रशांत वरवटे भाजपा, फरीद अत्तार, योगेश तपसाळे
nagarsevak election/शिंदे सेना, वार्ड क्रमांक ६ ब मधून राजेंद्र सुर्यवंशी शिंदे सेना, वार्ड क्रमांक ७ अ नम्रता शिंदे भाजपा, प्रियंका मोरे शिंदे सेना, ब मधून पृथ्वीराज साळुंके, धर्मराज जाधव भाजपा, विजय पतगे शिंदे सेना, वार्ड क्रमांक ९ अ अजयकुमार देडे, राजेंद्र शिंदे शिंदे
सेना, शहाजी मस्के, विक्रम मस्के भाजपा, वार्ड क्रमांक १० अ मुस्तफा चौधरी शिंदे सेना, ब मधून जयश्री चालुक्य, प्रिया पवार शिंदे सेना, वार्ड क्रमांक ११ अ दत्ता रोंगे, शहाजी मस्के भाजपा, वार्ड क्रमांक १२ ब मधून अश्विनी सुर्यवंशी शिंदे सेना या ३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.








