Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतनमध्ये बालदिन उत्साहात; भविष्यतंत्रज्ञानावर आधारित नाटिकेने लावली विशेष छाप”

0
87

 

हिंगणघाट (प्रतिनिधी : सचिन वाघे)

– ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथे बालक दिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. आधुनिक शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करणारी ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध असून, आजचा बालदिन कार्यक्रम याचे उत्तम उदाहरण ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल यांनी त्यांच्या कार्याची व योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सायली यांनी समर्थपणे पार पाडले.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी सादर केलेली “आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि माणुसकीची जपणूक” या विषयावर आधारित नाटिका कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. संतोषी ढगे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेत ‘रोबो शिक्षक’ तसेच वर्ष 2050 मधील टाईम मशीनद्वारे भविष्यातील प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. नाटिकेची मांडणी, संदेश आणि कलाकारांचे सादरीकरण यांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.

Wardhanews /या प्रसंगी शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल तसेच उपमुख्याध्यापिका शिल्पा जयस्वाल उपस्थित होत्या. ज्येष्ठ शिक्षिका वर्षा इखार यांनी बालदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सुंदर व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.
तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समतोल साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा देणारा ठरला. कार्यक्रमाने सर्वांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here