Nagarparishadnews /नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी डोंगरे यांना काँग्रेसचा अधिकृत पाठींबा ; काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत

0
79

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : आगामी हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगरपरिषद अध्यक्ष पदाकरिता शुभांगी सुनिल डोंगरे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठींबा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर (अध्यक्ष, वर्धा जि. काँ. क.) यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात नगरसेवक पदाकरिता मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. दोन्ही पक्षांचे नगरसेवक उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शुभांगी डोंगरे यांना समर्थन देतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Nagarparishadnews /या निर्णयामुळे हिंगणघाटच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून आगामी निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here