अनेक मित्र – मैत्रिणीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या….
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा
उमरगा : स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी देश विदेशात विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. १९९५ – १९९६ या वर्षातील दहावीचे वर्गमित्र – मैत्रिणी तब्बल 29 वर्षांनी रविवार दि. १४ रोजी येथे झालेल्या स्नेहमेळाव्यात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला.
कार्यक्रम उमरगा शहराजवळील लातूर रोड लगतच्या बिरूदेव मंदीरासमोरील हॉटेल एम बी रिसाॅर्ट मध्ये रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. दिवंगत मित्र मैत्रिणी व गुरुजनांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. परिचय देताना अनेकांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या कथा सांगितल्या तर अनेकांनी शालेय व जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झालेले दिसून आले. दिवसभर मनोरंजक कार्यक्रम, शाळेच्या काळातील गाढवाचे शेपूट, मटकी फोड, संगीत खुर्ची, व्हॉली बॉल, गाण्यांच्या भेंड्या असे खेळ खेळले गेले.
सर्व मित्र मैत्रिणींनी ग्रूप डान्स तसेच एकमेकांचा परिचय करुन आनंद घेतला. सर्वांनी आपला नवा परिचय देत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यात विवेक तपसाळे यांनी सुमधुर आवाजात गाणे सादर करून कार्यक्रमाचा गोडवा वाढविला.
माधुरी तडकले, अबोली नाईक, भाग्यश्री पाटील, ज्योती भांडेकर, राजश्री पाटील, सुलक्षणा पाटील, आरती ठाकूर, संजीवनी पाटील, अनिता मनगुळे, रूपाली शेळके, चंद्रदीप जाधव, शिवशंकर दंडगे, विवेक तपसाळे, लक्ष्मण पवार, प्रेमनाथ सरवदे, देवीदास भोसले, नेताजी ओवांडकर, किशोर नागदे, बालाजी जाधव, दिपक सुर्यवंशी, व्यंकट धुमाळ, संतोष हेबळे, राहूल दिवटे, संजय शेवाळे, धनराज मुळे, दयानंद जाने, सिताराम स्वामी सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक सुर्यवंशी व मिरा भोसले – चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक लक्ष्मण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली शेळके यांनी केले.
सर्व शालेय मित्र मैत्रीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आयुष्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत दरवर्षी एक दिवस पहिल्या टप्प्यातील मित्र मैत्रिणी ना देण्याचे वचन घेतले — रुपाली शेळके पुणे.
——–
एकाच बेंचवर बसून जीवनाचे सप्तरंगी स्वप्न रांगविणारे मित्र मैत्रीणी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने खूपच आनंद झाला – चंद्रदीप जाधव वापी गुजरात.
———–
आज ही काही बाल मित्र मैत्रिणी एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात हे ऐकून मन भारावून गेले. – प्रा. डॉ. दिपक सुर्यवंशी कोल्हापूर.
———–
इतक्या वर्षांनी सर्व मैत्रिणींची भेट झाली, दिवसभर खुप मस्ती केली. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होता. — नेताजी ओवांडकर माकणी.
———–
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिवनात सुखरूप वाटचाल सुरू असून अजूनही शाळेत जाऊन बालपणाचे गोडवे गावे असे वाटते. —- प्रेमनाथ सरवदे पुणे.
_________
गुरुजनांच्या संस्काराच्या शिदोरीमुळे आम्हा मित्र मैत्रिणींना आदर्श जीवन शैलीचा मार्ग मिळाला — मिरा भोसले – चव्हाण.
———-
सुखद आठवणी, चेहऱ्यावर हसू फुलविणारे मजेशिर प्रसंग, डोळ्यात आसू आणणाऱ्या हयात नसलेल्या मित्र मैत्रिणींच्या, शिक्षकांच्या दुःखद आठवणी, एकमेकांच्या खोड्या, लटक्या तक्रारी अशा विविध रंगांनी, चवीने भरलेला हा गेट टुगेदर चा दिवस सर्वांनाच एक वेगळी ऊर्जा देऊन गेला. मैत्रीच्या या न संपणाऱ्या उर्जेने आपले जीवन रिचार्ज करण्यासाठी दरवर्षी भेटणे हे आवश्यक आहे.
— लक्ष्मण पवार उमरगा








