सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे
उमरगा: कलदेव निंबाळा येथील महिला शेतकरी सौ. सविता ओम पवार यांच्या शेतामध्ये शेततळ्याचे उद्घाटन उपसरपंच तथा गाव विकास समिती सचिव सुनीता देविदास पावशेरे यांच्या हस्ते (दि.११) रोजी करण्यात आले.
गावामध्ये शेतकरी लोकवाटा, वॉटर संस्था यांच्या सहकार्यातून पाच शेततळ्यांच्या कामाला सुरुवात होत आहे. शेतकरी आणि वॉटरशेड संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये शेततळे, सिमेंट बंधारे, दगडी जाळी बांध, ओढे खोलीकरण करण्यात आलेली आहेत.
या कामामुळे शिवारात पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकर्यांचा फायदा होत आहे असे सुनिता पावशेरे यांनी सांगितले.
Dharashivnews /यावेळी गाव विकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार वॉटर संस्थेचे प्रतिनिधी विठ्ठल ढवळे, देविदास पावशेरे, ग्रामपंचायत सदस्य राजोत्तम गायकवाड, वसुंधरा सेवक गहिनीनाथ बिराजदार, विश्रांतीबाई जामगे, योगेश जामगे आदी शेतकरी उपस्थित होते.








