Hingnghatnews /हिंगणघाट नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी निलेश ठोंबरे; स्वीकृत सदस्यांची नियुक्ती जाहीर

0
90

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : हिंगणघाट नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी निलेश ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. नगरपालिकेतील सत्ताकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतानाच स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीकडून माजी महिला नगरसेविका शारदा पटेल, माजी नगरसेवक अंकुश ठाकूर तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर कोठारी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

सध्या हिंगणघाट नगरपालिकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या डॉ. नयना उमेश तुळसकर कार्यरत आहेत.

Wardhanews /उपाध्यक्षपदाची निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांमुळे नगरपालिकेतील सत्तासमीकरणे अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here