सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे
उमरगा: तालुक्यातील भुसणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.१२) रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक गोविंद सोमवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या उल्लेखनीय कार्याविषयी सविस्तर माहिती शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल जाधव,परमेश्वर साखरे,विजयकुमार धोत्रेकर,श्रीमती अनिता रांजणकर,रोहित गायकवाड यांनी सांगितले.
Dharashivnews /विद्यार्थ्यांनी जिजाऊ यांची वेषभूषा परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांचे खूप-खूप अभिनंदन केले.
Umrganews /प्रास्ताविक मनोगत गोविंद सोमवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन व्यंकट कांबळे यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.








