प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :कोरोना काळापूर्वी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे अद्यापही पूर्णतः पूर्ववत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर आंदोलन सम्राट श्याम भास्करराव ईडपवार यांनी थेट केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.
कोरोना महामारीपूर्वी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर तब्बल २० सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे होते. मात्र सध्या केवळ १० गाड्यांचेच थांबे सुरू असून, त्यातील फक्त ४ गाड्या दररोज थांबतात तर उर्वरित ६ गाड्या साप्ताहिक स्वरूपाच्या आहेत. यामुळे हिंगणघाट व परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात श्याम ईडपवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवून उर्वरित १० सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे थांबे तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.”
जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दिनांक 19 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट येथे बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, अ
Hingnghatnews /सा कडक इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन व शासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घोषणेमुळे हिंगणघाट शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








