प्रतिनिधी सचिन वाघे
वडनेर :- पोलीस स्टेशन हद्दीत ऑपरेशन निशाणा अंतर्गत प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अवैध चोरटी रेती वाहतुकीवर यशस्वी रेड कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत विना क्रमांकाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेण्यात आला.
कारवाईदरम्यान ट्रॉलीमध्ये सव्वा ब्रास अवैध रेती आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सोनालिका ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाजे रुपये 7,00,000/- तसेच सव्वा ब्रास रेती किंमत रुपये 8,000/- असा एकूण रुपये 7,08,000/- चा मुद्देमाल समाविष्ट आहे.
Hingnghatnews /सदर प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस स्टेशन वडनेर मार्फत करण्यात येत आहे.








