संग्रामपूर( अनिलसिंग चव्हाण)ः- प्रजासत्ताक दिनानिमित्त आज २६ / जानेवारी रोजी तालुक्यात विविध शासकीय,निमशासकीय कार्यालय, सहकारी संस्था, शाळा, विद्यालय,महाविद्यालये व इतर ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण व ध्वजवंदन करुन साजरा होणार आहे. ह्याकरता राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी ध्वजाची विटंबना होवू नये. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. तालुक्यात आज प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जि. प. शाळा तसेच खाजगी विद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती ,विविध सह. संस्थांमध्ये ध्वजारोहण होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमात व शालेय प्रभात फेरीत राष्ट्रीय ध्वजाचे सन्मान चिन्ह, तिरंगा टी-शर्ट, पताका, तसेच प्लास्टिक व कागदी तिरंगा ध्वजाचा उपयोग या राष्ट्रीय उत्सवात केला जातो. राष्ट्रध्वज ही राष्ट्राची ओळख नसून ती अस्मिता आहे.
सदर ध्वज कोठेही फेकून न देता काळजीपूर्वक वापरून तिरंग्याचा सन्मान करावा त्याची विटंबना होऊ नये. यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सुद्धा दक्षता घेऊन काळजी घ्यावी.
Tahsildar news /असे आवाहन विद्यार्थी,सर्व कर्मचारी , नागरिक व तरुण युवकांना संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.








