Nivdnuknews /संग्रामपूर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

0
150

 

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.dham panchayat

यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील चार रिक्त पद, चिखली तालुक्यातील सहा पदे तर मेहकर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.nivdnuknews

संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे : मारोडा ग्रामपंचायत प्रभाग क्र.3(अनुसूचित जमाती), धामनगांव ग्रामपंचायत प्रभाग क्र.2(ना.मा.प्र.प्रवर्ग),वकाणा ग्रामपंचायत प्रभाग क्र.2( ना.मा.प्र.प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील) असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आह.SangrampurNews

मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :* ग्रामपंचायत पारडा, ग्रामपंचायत पेनटाकळी, ग्रामपंचायत वाग्देव व ग्रामपंचायत दुर्गबोरी असे चार रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

Grampanchayat चिखली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य रिक्त पदांचे गावे :थेट सरपंच पदासाठी कव्हळा ग्रामपंचायत(ना.मा.प्र), कोनड ग्रामपंचायत(ना.मा.प्र./स्त्री), किन्ही सवडत ग्रामपंचायत(अनुसूचित जमाती) तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी किन्हीनाईक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 व 3 (अ.ज. स्त्री), बोरगाव वसु ग्रामपंचायत (अ.जा.) असे सहा रिक्त ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे.

*निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :* निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here