Gamenews /तरूणाई लुडो, सापशिडी आणि तीनपत्तीच्या डिजिटल जाळ्यात! मनोरंजनाकडून जुगाराकडे वाटचाल; पालकांची चिंता वाढली

0
17

ऋषिकेश सुरवसे

उमरगा: उन्हाळ्याच्या सुट्टीतील मनोरंजनाचे साधन म्हणून सापशिडी,लुडो तीन पत्ती, या खेळाकडे पाहिले जात होते. मात्र, इंटरनेटच्या युगात या खेळांना आता जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील तरूणाई या ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित झाली असून यामध्ये किशोरवयीन मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, स्किल गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. या ऑनलाइन गेम मुळे अनेकांच्या आयुष्याचा खेळ होत आहे. इंटरनेटच्या अनेक साइटवर हे ॲप उपलब्ध आहेत.

त्यावरून हे गेम डाऊनलोड करण्यात येतात. ॲपवर आपला स्वतःचा आयडी तयार करावा लागतो.

यासाठी दोन प्रकार आहेत, पहिल्या प्रकारात पूर्वी पासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाईल क्रमांक ॲप ॲडमीनला पाठवतात. त्यानंतर ॲडमीन यूजशी संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो. दुसऱ्या प्रकारात जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देतो. आपल्या आयडीवर लॉगिंग केल्यानंतर यूजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो.ludogame

यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल, त्या प्रमाणात तो खेळू शकतो. जितकी रक्कम लावली, त्याच्या दुप्पट रकमेचे आमिष खेळाडूला दाखविण्यात येते. यदाकदाचित जिंकल्यास जिंकलेली रक्कम युजर्स विड्रॉल करून घेवू शकतो. यासाठी ॲपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते.crimenews

या टीमच्या व्हाट्सअप ॲप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. त्यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.

 

तरुणांना जाहिरातीतून भुरळ

सोशल मीडियाचे फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच विविध चैनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येत आहेत.games

Gamenews/यामध्ये एव्हिएटर, तीन पत्ती, जंगली रमी, लुडो, तसेच क्रिकेटशी संबंधित खेळाच्या जाहिरातींचाही समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ घालण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here