Hingnghatnews /ऑनलाईन सुरक्षिततेसाठी सायबर सजगता अत्यावश्यक : डॉ. उमेश तुळसकर

0
1

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे महिला सक्षमीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान तसेच सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उमेश तुळसकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस अधीक्षक डी. वाय. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, सुनीता महाजन, सायबर विभागातील अधिकारी, उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल, प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे (TIST) आणि प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे (तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

प्रास्ताविकामध्ये डॉ. सपना जयस्वाल यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक डी. वाय. अनिल राऊत यांनी विद्यार्थिनींना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

सायबर विभागातील अधिकारी सुनीता महाजन आणि पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांनी ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

Wardhanews /“ऑनलाईन जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने सायबर सजगता बाळगणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. उमेश तुळसकर यांनी केले.

School news/कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी नरवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिनाक्षी पवाडे यांनी केले. या उपक्रमाला प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here