संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या कडेला माती व खडीचा भाग निर्माण झाला असून, याच ठिकाणी प्रवास करणाऱ्या एसटी बसचा रस्त्याच्या कडेला घसरण्याचा प्रकार समोर आला आहे.
सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना योग्य खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते, त्यामुळे वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
विशेषतः एसटी बस, ट्रक, चारचाकी तसेच दुचाकी वाहनचालकांनी वेग कमी ठेवावा, रस्त्याच्या कडेला जाणे टाळावे आणि समोरून येणाऱ्या वाहनांना सुरक्षित अंतर देऊन मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाने वाहनचालकांना योग्य सूचना देणारे फलक, बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
RoadWork/त्यामुळे टुणकी–लाडनापूर रोडने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक वाहने चालवावीत, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.






