केतकी माटेगावकर आणि इशिता दत्ताच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण!
विदर्भातील ‘नंबर वन’ दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महायुती व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भव्य महादहीहंडी उत्सवाचा थरार चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. गोविंदा पथकांचे थरारक मानवी मनोरे, ढोल-ताशांचा गजर आणि तरुणाईचा अफाट जल्लोष यामुळे संपूर्ण चिखली शहर उत्साही वातावरणात न्हाऊन निघाले होते.DahiHandiFestival
या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन चिखली मतदारसंघाच्या आमदार तथा सोहळ्याच्या स्वागताध्यक्ष श्वेता महाले पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.ShwetaMahale
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आमदार श्वेता महाले यांच्या महायुतीच्या महादहीहंडीला यंदाही तरुणाईने अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डीजेच्या तालावर तरुणाईने केलेला जल्लोष हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
दरवर्षी या महादहीहंडीची भव्यता आणि लोकप्रियता वाढत असून, त्यासोबत तरुणांचा सहभागही दिवसेंदिवस वाढत असल्याचे यंदाच्या प्रचंड गर्दीमधून दिसून आले.ShwetaMahale
दहीहंडी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले की, भाजपा युवा मोर्चाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत सुंदर आणि भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. केवळ चिखलीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून तरुणाई या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाली होती. तरुणांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जल्लोषामुळे ही महादहीहंडी खऱ्या अर्थाने तरुणाईचा लोकोत्सव ठरल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित गोविंदा आणि तरुणांना शुभेच्छा देताना त्या पुढे म्हणाल्या की, दहीहंडीचा खेळ जसा थरावर थर चढवून यश संपादन करण्याचा असतो, तशीच तरुणांनी आपल्या आयुष्यातील यशाची प्रत्येक पायरी टप्प्याटप्प्याने चढावी. या प्रवासात त्यांची हक्काची बहीण म्हणून मी, श्वेता महाले, कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. महायुती सरकारने या खेळाला अधिकृत क्रीडा प्रकाराचा दर्जा दिल्यामुळे गोविंदांच्या साहसाला आणि कौशल्याला मोठे व्यासपीठ मिळाले आहे.ChikhliNews
या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी सहभागी होत दहीहंडी फोडण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले. महिला, तरुण आणि सर्व वयोगटांतील हजारो नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपा युवा मोर्चाच्या सुरेख नियोजनामुळे हा महादहीहंडी उत्सव अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.DahiHandiCelebration






