बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत तब्बल ३४ कोटी ७७ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा आरोप!BuldhanaUrban
बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता कथित आर्थिक व्यवहार करून संस्थेचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे यांच्यासह इतरांविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.FinancialCrime
लेखापरीक्षण आणि त्यानंतर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कथित अनियमितता समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ मध्ये सेवेतून काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारीनुसार, नियमबाह्य कर्ज मंजूर करणे, शून्य टक्के व्याजदराने कर्ज घेणे, बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.ला बिनव्याजी अॅडव्हान्स देणे, परवानगीशिवाय मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, व्याजमाफी आणि खात्यांमधील कथित अफरातफर, असे विविध आरोप करण्यात आले आहेत.
या कथित व्यवहारांमुळे संस्थेचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे करण्यात आला आहे.34Crore
या प्रकरणाची तक्रार लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल यांनी केली असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.
Pumecrime/मात्र, या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. पुढील तपासात या कथित आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे.






