Home Breaking News पिंपळगाव काळे येथील 24 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

पिंपळगाव काळे येथील 24 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगांव जामोद

पिंपळगाव काळे येथील 24 वार्षिय पुरुषोत्तम शेलकर या युवकाने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. पुरुषोत्तम ने एक चिटठी लिहून म्हटले की माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी आत्महत्या करीत आहे आणि मोठ्या भावाला आई-वडिलांची काळजी घे असा संदेश दिला . युवक अत्यंत सज्जन आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ श्री राऊत करीत आहे