Home Breaking News कांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ

कांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ

 

ऋषी जुंधारे ,वैजापूर प्रतिनिधी

कांदा निर्यायतबंदी संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले.
यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली की 2018-19 मध्ये 21.83 लक्ष मेट्रिक टन, 2019-20 मध्ये 18.50 लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे सांगितले.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या 4 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. बांगला देश, नेपाळ सीमेवर 500 ट्रक्स थांबून आहेत.