किनगाव येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा खरेदी करून व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयात फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल

0
396

 

(प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील किनगाव बु येथील एका कांदा खरेदी करून खोटे धनादेश देवुन उत्पादक शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणुक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार छगन प्रमोद चौधरी वय५२ वर्ष शेतकरी ,राहणार किनगाव बु यांच्याकडुन किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्स किनगावचे संचालक संदीप सुधाकर कोळी , आणी घनःश्याम सुधाकर कोळी यांनी सन् २०२०च्या फेब्रुवारी ते मार्च २०२०या कालावधीत चौधरी यांच्या शेतात उत्पादीत केलेले ३६टन कांदे किमत६ लाख११ हजार२५९चे विकत घेवुन त्यापैक्की २लाख५२ हजार रुपये रोख देवुन उर्वरीत रक्कम ३ लाख६३ हजार२३९ रूपये त्याचे पैसे न देता तिन धनादेश स्वरूपात स्टेट बँक ऑफ इंडीया चे दिले मात्र संबधीतांच्या खात्यात रक्कम नसल्याने तिघ धनादेश बाऊंस झालेत , धनादेश अनादर झाल्याबाबत संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आपणास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद छगन प्रमोद चौधरी यांनी दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध भाग ५ गु .र .न.५२ / २०२१ भादवी कलम४२०, ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here