सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे .हे कोरोना मुक्त झाले ’17 फेब्रुवारी रोजी ना . डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता ‘त्यानंतर ते मुंबईतील बीचकॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल झाले होते ‘यशस्वी उपचारानंतर नामदार डॉक्टर शिंगणे यांना 22 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता डिस्चार्जर मिळाला ।पुढील बारा दिवस ते विलगीकरण कक्षामध्ये आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाते असल्यामुळे .गेल्या दीड वर्षापासून ते सतत कोरोनाच्या काळामध्ये औषधे च्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मेडिकल दुकानदारांनी औषधाचा साठा करू नये यासाठी सतत संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत राहिले ‘तसेच कोरोना च्या काळामध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना .सकाळ समूहातर्फे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘कोरोना योद्धा म्हणून सन्मानाने सुद्धा करण्यात आले होते .आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ‘ ना .राजेश भैय्या टोपे ना . जयंत पाटील ना .अनिलजी देशमुख ना .बच्चू कडू यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे हे सर्व मंत्री कोरोना च्या काळामध्ये सतत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकांच्या रक्षणासाठी फिरत राहिले ‘ ना .डॉ .राजेंद्रजी शिंगणे हे कोरोना मुक्त व्हावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुद्धा केली होती !






