Home Breaking News सावखेडासिमच्या जंगलात शेतकरी तरूणास मधमाश्यांनी हल्ला करून केले गंभीर जखमी

सावखेडासिमच्या जंगलात शेतकरी तरूणास मधमाश्यांनी हल्ला करून केले गंभीर जखमी

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील दहिगाव गावापासुन तेथून जवळच असलेल्या सावखेडासिम शिवारात सावखेडासिम येथील राहणाऱ्या संदीप हरी बर्डे या ३५ वर्षीय तरुणास सातपुड्याच्या जंगलातील निमळाव रस्त्यावर आपल्या शेतात कामास जात असताना अचानक आगे मोहोळा वरील मधमाशांनी हल्ला घालून शरीरावर विविध ठीकाणी जावा घेत त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संदीप हरी बर्डे हा युवक आपल्या शेतात कामासाठी जात असतांना यांच्या शेत शिवाराजवळ अचानक मद्यमाश्यांनी हल्ला करीत बर्डे यास गंभीर जख्मी केले .जख्मी संदीप वर सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास घरी परत पाठवले आहे .