पातुरडॉ बु जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत प स संग्रामपूर मार्फत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप प स सभापती सौ रत्नप्रभा ताई धर्माळ यांच्या हस्ते करण्यात आले
या मध्ये एक कुटुंबाला एक डबी देण्यात आली असून या मध्ये बारा वर्षा खालील मुलाना 2 गोळ्या व बारा वर्षावरील वयोगटातील लोकांना 4 गोळ्या उपाशीपोटी सकाळी घ्याव्या अशाप्रकारे तीन दिवस गोळ्या घेण्याचे आव्हाहन प स सभापती सौ रत्न प्रभा ताई धर्माळ यांनी केले आहे या वेळी प स संग्रामपूर चे बिडीयो,भाजप ता प्रमुख लोकेश राठी,जेष्ठ भगवान राठी,कृषी अधिकारी उंदरे साहेब,माजी सरपंच सावळी प्रकाश अरबट,सुधाकर शेजोळे, अविनाश धर्माळ,राजू मुयांडे, गोवर्धन खोंड,संजय ठाकरे,यांची उपस्थिती होती आर्सेनिक अल्बम च्या डब्या प्रत्येक ग्रा प च्या सरपंच याना देण्यात आल्या