सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
गेल्या तीन वर्षांपासून शासनाने कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबवली नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण युवक – युवती वर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे !तसेच सैन्य भरती व पोलीस भरतीची तयारी करणारे तरुणांना कुठल्याच प्रकारचे ही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ‘त्यांच्यावर व त्यांचे परिवारावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे !या संदर्भामध्ये माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ‘तसेच अमरावती विभागीय अध्यक्ष माजी सैनिक अर्जुन गवई ‘यांनी 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देऊन भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी केली .जर भरती प्रक्रिया राबवली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे .अर्जुन गवळी यांनी 20 वर्ष सैन्यदलामध्ये नोकरी केली निवृत्त झाल्यानंतर गोरगरिबांचे मुलं सैन्य व पोलीस भरती मध्ये दाखल झाले पाहिजे या हेतूने त्यांनी साखरखेरडा येथे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लक्ष करिअर अकॅडमी चे प्रशिक्षण वर्ग सुरू केले .व त्यांना प्रशिक्षण देऊन हजारो मुलांना त्यांनी सैन्यामध्ये भरती केले ‘परंतु आज रोजी तीन वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारचे सैन्य भरती व पोलीस भरती राबवली नसल्यामुळे मुलांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे !सध्या स्थिती मध्ये विद्यार्थ्यांनी फाशी घ्यावी काय असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे !त्यांनी अशी मागणी केली आहे की ज्याप्रमाणे सैन्य भरती मध्ये आसाम मध्ये ‘मुलांची उंची ही 162 इंच असते .पंजाब मध्ये 164 ‘ही इंच महाराष्ट्रामध्ये सैन्यभरती मध्ये का नसते कारण महाराष्ट्र मध्ये सैनिक भरतीच्या वेळेला 170 इंच उंची घेतली जाते ‘असा सवालही यावेळी अर्जुन गवई यांनी उपस्थित केला !शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली नाहीतर ४ एप्रिल पासून राज्यभर आंदोलन तीव्र करू असा इशाराही यावेळी विभागीय अध्यक्ष अर्जुन गवई यांनी दिला आहे ।







