Accdent news:सकाळच्या वेळी बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाट्याजवळ जोरदार बस अपघात घडला.
मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर अघळपघळ धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर जवळपास १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, त्यामुळे बस आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे (चक्काचूर) झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला आणि विटा गवतात पसरल्या होत्या.
जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तात्काळ खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Accdent news:अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना नेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांचे मदतकार्य सुरूच आहे.