सुनेसह नातूची हत्या करणाऱ्या गायकीचे वकीलपत्र घेऊ नये, संग्रामपूर वकील संघाचा ठराव ( advocate )

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

बुलढाणा:advocate:  गर्भवती सुनेसह नातुची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव संग्रामपूर वकील संघाने घेतला आहे. दरम्यान आरोपीला आज तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


संग्रामपूर येथे काल जिल्ह्याला हादरविणारे हत्याकांड घडले. आरोपी नारायण भिकाजी गायकी ( वय ७०) याने काल २३ जानेवारीला आपली गर्भवती सून अश्विनी गायकी( २८) व नातू समर्थ गायकी(९) यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. यात समर्थ याचा जागीच तर अश्विनीचा शेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बैलगाडा शर्यतीतून एकोपा वाढीस लागावा- जयश्रीताई शेळके ( Bailgada Sharyat )

या घटनेने संग्रामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील समाजमन सुन्न झाले असून आरोपीविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

वकील संघाचा एकमुखी निर्णय

याला संग्रामपूर वकील संघही अपवाद ठरला नाही. आज अध्यक्ष ऍड. एस. एम. गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या घटनेवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात आला.

 

advocate: तसेच आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ऍड. सातव यांनी मांडलेल्या ठरावाला ऍड. गिरजापुरे यांनी अनुमोदन दिले. बैठकीला वकील सर्वश्री चिकटे, खंडेराव, बावस्कर, वानखेडे, कीर्तने, क्षीरसागर, बावणे, बेग आदी हजर होते.

Leave a Comment