लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर
ajgar news:लोणार येथील पटेल नगर येथील रहिवासी संतोष जाधव यांच्या घराच्या गेट मध्ये एक साप दिसला. त्यानी लगेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना याबाबत कळविले त्यानी तात्काळ घटनास्थळ गाठले.
अजगर ताब्यात घेऊन. त्यानंतर त्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याला याची माहिती दिली हा अजगर साप लोणार मानवी वस्ती मध्ये आढळलेली पहिलीच घटना आहे अजगर हा साप वन्यजीव कायद्याअंतर्गत शेडूल वन चा प्राणी आहे कारण त्याचे वाघाएवढेच महत्व आहे.
या नंतर त्याला त्याच्या निसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.यावेळी सर्पमित्र विनय कुलकर्णी म्हणाले की, अजगर हा बिनविषारी साप असुन त्याच्याबद्दल ग्रामिण भागात अनेक गैरसमज आहेत.
जुन्नर पोलीस ठाणे विरुद्ध होणार वंचितचा एल्गार..!! – प्रदीप गौतम साळवे_( vanchitnews )
हा साप विषारी घोणस सदृष असल्याने लोक त्याला विषारी समजुन मारतात. लोणार परिसरात अनेक सापाच्या जाती आढळतात. त्यापैकी, नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चारच जाती विषारी आहेत. सापांना मारणे, त्यांची तस्करी करणे, सापाचे खेळ करणे वन्यजीव कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे.
कुलकर्णी यांनी आजवर हजारो सापांना पकडून जीवदान दिले आहे. जर आपल्या घराच्या परिसरात साप निघाला तर त्याला न मारता जवळच्या सर्पमित्राशी किंवा वनकर्मचा-यांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचे पाणी सापाच्या बिळात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतात तसेच सगळ्या सापांच्या पिल्लांचा जन्म या काळात होतो त्यामुळे ग्रामीण भागात काळजी घेणे आवश्यक आहे.
लोणार शहरात अजगराच्या पिलाला सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान ( ajgar news )
या अजगराला सोडायच्या वेळी RFO प्रकाश सावळे, वनरक्षक कैलास चौधरी सर्पमित्र सचिन कापुरे, कमलेश आगरकर, उमेश चिपडे उपस्थित होते.
लोणार तालुक्यात साप अढळल्यास सर्पमित्रानं फ़ोन करावा.
सर्पमित्र विनय कुलकर्णी
मो- 8888506010
सर्पमित्र कमलेश आगरकर
मो – 9689288516
सर्पमित्र सचिन कापुरे
मो- 8888188508