उर्दू शाळेच्या छतावर चार अर्भक आढळले शहरात एकच खळबळ ,पोलिसांचा तपास सुरू !Akola Crime

0
2

 

Akola Crime: अकोल्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेच्या छतावर चार अर्भकं सापडल्याची माहिती मिळाली आहे.

तर यामुळे संपूर्ण अकोला परिसरात खळबळ माजली आहे. अकोला पोलीस सध्या घटनास्थळी पोहचून या घटनेचा शोध घेत आहेत.

तर ही अर्भकं या ठिकाणी आली कुठून याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.

तर ही घटना अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर घडली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

4 नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे.

तर बाकीचे मासाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही.

तर या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ज्या ठिकाणी अर्भकांचे हे अवशेष सापडले तिथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त 500 किंवा 1000 मीटर अंतरावर आहे.

तर आता पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अर्भकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे.

तर कसा झाला धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश?जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू छतावर गेला.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी एक तरूण चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता त्याला रक्ताने माखलेली एक प्लास्टिक पिशवी आढळली. त्यानंतर त्याने ती उघडली आणि त्यात अर्भक आढळले.

Akola Crime: त्याने तातडीने फोन करूनपोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तसंच पुढील तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here