Akolanews | मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews : मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने घेण्यात आली आहे.या स्पर्धेत मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक व भव्य क्रीडा विविध स्पर्धा मूर्तिजापुर तालुक्यात आयोजित केल्या होते.

आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवी झंडी दिली सदर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता.

कार्यक्रमाला ठाणेदार भाऊराव घुगे,ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले,दीपक अग्रवाल,माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे,तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे,शहराध्यक्ष रितेश सबाजकर,राजू कांबे,कमलाकर गावंडे,कोमल तायडे,आयुषी तायडे,अमोल प्रजापती,गोपाल दायमा व इतर अनेक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रणव खंडोबल्लर याला ५१०० रुपये बक्षीस देण्यात आले.

Crimenews | अडीच लाख रू साठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ,पतीसह सासरच्या ५ जणांनवर गुन्हे दाखल

तसेच द्वितीय क्रमांक आकाश मोरे याला ३१०० तर तृतीय अजय होले यांना २१०० रुपये बक्षीस आमदार हरीश पिंपळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,क्रीडा क्षेत्रातील विनोद काळबांडे,दिनेश श्रीवास शहरातील क्रीडा क्षेत्रातील युवक शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले.

Akolanews : विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत मनोहर ताकतोडे व ७२ वर्ष हे सुद्धा धावले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment